सभासदासंबंधी पात्रता
कोणत्याही व्यक्तीस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 22 प्रमाणे खालील अटीची पुर्तता केल्याशिवाय सभासद होता येणार नाही.
1. भोकरदन तालुक्यातील जालना जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करना-या कोणत्याही शिक्षकास संस्थेचे सदस्य होता येईल. मात्र या संस्थेच्या कार्यक्षेत्रात एखादी याच प्रकारची संस्था असल्यास अगर स्थापन झाल्यास तिचे कार्यक्षेत्र या संस्थेच्या कार्यक्षेत्रातून वगळले जाईल. संस्थेचे कार्यक्षेत्र भोकदरन तालुका राहील.
2. अधिनियम, नियम व उपविधी यातील अटीची पूर्तता त्याने केली पाहिजे.
3. भारतीय करार कायदयानुसार करार करण्यास पात्र असला पाहिजे.
4. त्याने रु 801/- प्रवेश फी व किमान एका भागाची पूर्ण किंमत भरली पाहिजे.
5. तो चांगल्या वर्तणुकीचा असला पाहिजे.
6. त्याचा सदस्य होण्या बद्दलचा लेखी अर्ज समितीतील एकूण सदस्यांच्या निम्याहुण अधिक बहुमताने मंजुर केला असला पाहिजे.
7. तो जालना जिल्हा परिषदेच्या कायम सेवेता शिक्षक म्हणुन (नौकरीत) असला पाहिजे.
8. संस्थेचे उद्देश त्यास समजले ले पाहिजेत.
9. तो समान उद्देशअसलेल्या इतर संस्थेचा सदस्य नसला पाहिजे.
10.त्याचे वेतन अदा करणा-या अधिका-यास त्याचे वेतनातुन संस्थेच्या कर्जाची, वर्गणीची व इतर रक्कम कापुन घेण्यास लेखी अधिकारपत्र (परत घेता न येईल असे ) लिहून दिले असले पाहिजे.